सोलापूर प्रतिनिधी
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे गुरुवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार, सकाळी 10.00 वाजता नॉर्थकोर्ट प्रशाला, सोलापूर येथे आगमन व शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव.
दुपारी 1.00 वाजता नियोजन भवन सात रस्ता येथे आगमन व सोलापूर जिल्हा नियोजन समिती च्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 03.00 वाजता होम मैदान येथे आगमन व सोलापूर जिल्हा कृषी महोत्सव सन 2023-24 च्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 04.00 वाजता हॉटेल सुर्या इंटरनॅशनल, मुरारजी पेठ सोलापूर येथे आगमन व विभागीय नाटय संमेलनाच्या आयोजनाच्या संदर्भात विविध संघटना व पदाधिकारी यांच्या समवेत स्नेह भेट. व सोयीनुसार सोलापूर येथून वाहनाने पुणे कडे प्रयाण .