पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या असोसिएशनच्या वतीने नाशिक येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेमधून सोलापूर जिल्ह्यातून शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव चा आशुतोष अण्णासो बागल या एकमेव खेळाडूचे याची ऑल इंडिया आट्यापट्या संघामध्ये निवड झाली.
27 डिसेंबर रोजी तामिळनाडू येथे 17 वर्षे वयोगटातील ऑल इंडिया अट्यापट्ट्याचे सामने होणार आहेत या सामन्यासाठी महाराष्ट्र राज्याचा संघ घोषित करण्यात आला . यामध्ये गादेगावचा आशुतोष अण्णासो बागल याची निवड झाल्याचे पत्र मिळाले. गावच्या भूमीमध्ये आट्यापाट्याची असणारी आवड या मातीमध्ये असणारे गुण यामुळे गादेगावचे नाव नेहमीच आट्यापाट्याच्या बाबतीत चर्चेत असते. गादेगाव म्हणजे आट्यापाट्याचे ऑलम्पिक चे मैदान म्हणून ओळखले जाते .अशुतोष बागल याच्या निवडीमुळे गावातील सर्व आट्यापाट्या प्रेमी यांनी त्याचे अभिनंदन केले.
या निवडीच्या निमित्ताने राज्य आट्यापाट्याचे अध्यक्ष कवीश्वर सर ,राज्याचे सचिव शरद गवार सर ,सोलापूर अध्यक्ष बाबासाहेब कापसे ,उपाध्यक्ष राजेंद्र मुंबरे ,दत्ता झांब,रे मल्हारी भुसनर, जगन्नाथ ओव्हाळ, शितल मस्के आदी उपस्थित होते.
या यशस्वी वाटचालीसाठी अनिल बागल ,विकास बागल ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी अभिनंदन केले त्याचबरोबर मुलींच्या संघांमध्ये सायली बागल, अश्विनी गडदे यांच्या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.