पंढरपूर प्रतिनिधी
शनिवार रोजी 9 तारखेला शिंदे गटाची मीटिंग पंढरपूर रेस्ट हाउस मध्ये पार पडली. त्या वेळी शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते शिवसेना सोलापूर जिल्हा महिला संघटक या पदी वंदना पंत यांची निवड करण्यात आली.
यावेळी महेश नाना साठे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष चरणराज चवरे ,महिला अध्यक्ष मुबिना मुलाणी ,महिला व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी वंदना पंत म्हणाल्या की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, संपर्क प्रमुख शिवाजी सावंत व सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या योजनांची माहिती महिला पर्यंत पोहचविणे,महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.महिलांना विविध प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणार आहे. माझ्या वर जी जबाबदारी दिली आहे ती मी सार्थकी लावणार आहे.