पुणे प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र जी कुकरेजा, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पुणे शहर अध्यक्ष उमेश भाई शहा यांच्या हस्ते भाजप व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्ष पूर्णेश दिपक अगरवाल यांना निवड झाल्याबध्दल पत्र देण्यात आले.
या निवडबद्दल पूर्णेश अगरवाल म्हणाले की मी पुणे शहर व परिसरातील व्यापारी ,मालक,लहान मोठे व्यवसाय करणारे दुकानदार यांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहीन. भाजपा प्रणित व्यापारी आघाडीच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी माझ्या वर जो विश्वास दाखवला आहे.तो मी सार्थ करणार आहे.पक्षाची ध्येय धोरणे व्यापारी वर्गापर्यंत पोहचविनार आहे.
यावेळी व्यापारी व नागरिकांनी पूर्णेश अगरवाल यांची पुणे शहर भाजप व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.