मुंबई प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
मंद प्रकाश चंद्राचा,त्यात गोड स्वाद दुधाचा.अशा मंद-धुंद लहरीत कोजागिरी पौर्णिमा साजरी झाली.याच कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून विलेपार्लेच्या पिरोज स्टुडिओत सुर आणि शब्दांच चांदणं पसरलं होतं.गंधार धून प्रस्तुत "चंद्र आहे साक्षीला"हा नितांत सुंदर संगीतमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
निवेदिका पल्लवी वढवेकर बर्वे ह्यांनी कोजागिरी पौर्णिमेचे महत्व सांगतानाच फार पूर्वीपासून ही साजरी केली जाते याचा आवर्जून उल्लेख केला.पल्लवी वढवेकर बर्वे यांनी संदीप खरे,शांता शेळके,प्रसाद मोडक या कवींच्या कविता गाण्यांना अनुसरून सादर केल्या.कार्यक्रमाची सुरूवात शुक्रतारा मंद वारा ह्या अजरामर गाण्याने झाली.
तसेच श्रुती पटवर्धन व कल्पेश साखळकर ह्यांनी फार सुंदरपणे गाणे सादर केले.सीमा भीडे ह्यांनी केव्हातरी पहाटे सादर केलं तर प्रीयल ह्यांनी प्रितीच्या चांदराती..ही गाणी गाऊन प्रेक्षकांना खुष केलं.प्रेक्षकांत उत्कर्ष मंदिर मालाड च्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती रजनी वढवेकर,पार्ले टिळक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती लिमये आणि सौ.राधा पेठे हजर होत्या.खरसिकर सरांनी निवेदन व गाण्याची भरपूर तारीफ केली.गंधारधून ही श्रुती पटवर्धन व पल्लवी वढवेकर बर्वे ह्यांनी शब्द आणि सुर ह्यांच्या आनंद निर्मितीत लोकांना सामील करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली संस्था आहे.वेगवेगळ्या विषयांवर कविता आणि गाणी सादर करणे हा ह्या संस्थेचा मूळ उद्देश आहे.
आतापर्यंत पाऊस,रिश्ते,कोजागिरी,देवीचा जागर असे वेगवेगळे विषय त्यांनी सादर करुन प्रेक्षकांकडुन वाहव्वा मिळविली आहे.'चंद्र आहे साक्षीला'या उत्कृष्ट संगीतमय कार्यक्रमात संधिकाली या अशा-सीमा,प्रियल,तोच चंद्रमा नभात-कल्पेश,धुंदी कळ्यांना-सीमा,प्रियल,हे चांदणे फुलांनी-श्रुती,धुंद एकांत हा-श्रुती-कल्पेश,प्रितीच्या चांदराती-प्रियल,नवीन आज चंद्रमा-सीमा,कल्पेश,चांदण्यात फिरताना-श्रुती,मधु इथे अन चंद्र तिथे-सीमा,प्रियल,मनाच्या धुंदीत-कल्पेश,सखी मंद झाल्या तारका-प्रियल,शुक्रतारा मंद वारा-श्रुती,कल्पेश,केव्हा तरी पहाटे-सीमा,शारद सुंदर-सीमा,चंद्र आहे साक्षीला-श्रुती,कल्पेश या प्रतिथयश गायक-गायिकांनी आपल्या सुमधूर आवाजात गाणी सादर केली.तुमच्या शहरात,गावात तुम्हाला कार्यक्रम करायचे असतील तर श्रुती पटवर्धन-9004293081कींवा पल्लवी बर्वे-9819745698 यांच्याशी संपर्क साधावा.