ईगतपुरी तालुका प्रतिनिधी - नवनाथ गायकर
ईगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष पदी युवा नेते तथा पक्षाचे सक्रीय नेते पांडुरंग पा. वारुंगसे यांची निवड झाली आहे.
या निवडीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नाशिक जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खा. सुनील तटकरे यांचे आदेशान्वये केली आहे.
पांडुरंग वारुंगसे यांनी पत्रकार म्हणुन आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पत्रकारीतेतुन राजकारणात पदार्पण करतानां त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षाकडुन ईगतपुरी पंचायत समिती ची निवडणुक लढवुन ते सदस्य म्हणुन विजयी झाले होते. तर याच काळात ते ईगतपुरी पंचायत समिती चे उपसभापती ही होते.
घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती चे ही ते संचालक ते उपसभापती होते.यापुर्वी बेलगाव तर्हाळे या आपल्या गावचे सरपंच पद ही त्यांनी भुषवले होते.पक्षातही त्यांनी यापुर्वी तालुका ते जिल्हा पातळीवर विविध पदावर काम केले आहे.
--------------
पक्ष घरा-घरात पोहोचवणार- वारुंगसे
मा.अजित पवार,मा.सुनील तटकरे आदीसह पक्षाचे वरीष्ठ नेत्याच्यां मार्गदर्शनाखाली आपण काम करु व पक्ष घरा-घरात पोहचवु.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसह येणार्या काळात पक्ष अग्रेसर ठेवण्यासाठी आपण काम करु.
पांडुरंग वारुंगसे
नव निर्वाचित तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ईगतपुरी तालुका