▪️सोलापूर हुतात्मा नगरीत महाराजांचा २७ वर्षे होता सहवास ; १९२२ मधल्या शुभराय मठ, जक्कल मळा, समाचार चौक आदी ठिकाणी आजही सापडतात त्यांच्या पाऊलखुणा !
▪️ श्री शंकर सेवक आदित्य सावंत, रोहन बालनकर, धिरज कारंडे, हृद्विक सिद्धे, सागर पुल्ली, समर्थ जाधव, प्रतीक गोसावी यांच्या कृतिशील सेवेतून राबविणार उपक्रम !
▪️कार्तिक शु.८ वार सोमवार दि.२० नोव्हेंबर २०२३
अलीकडच्या काळात होऊन गेलेले एक सत्पुरुष ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू श्री शंकर महाराज(मालक) यांच्या प्रगट दिनानिमित्त मालकांच्या इच्छेने रॉबिन हूड आर्मी सोलापूर च्या दररोज अन्नदान उपक्रमामध्ये १०१ गरजु कुटुंबाची अन्नसेवा करत असल्याबद्दल मनपूर्वक आभार.
मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर।
दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर।।
यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है।
पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है।।
- श्री सद्गुरू शंकर महाराज
करता करविता शेवटी मालकच आम्ही फक्त कारणमात्र अशी आमची कायम धारणा राहिलेली आहे. आज प्रगट दिनानिमित्त शंकर सेवक म्हणून आपण काय करू शकतो हा विचार करून ही सकारात्मक कृती करत असल्याचे बोलताना सांगितले. सदर प्राप्त अन्नपदार्थ हे सोलापुरातील कुष्ठरोगी रुग्ण, निराधार, बेघर, अपंग व रस्त्यावरच्या गरजूंना एक वेळचे जेवण व गोड पदार्थ म्हणून वाढण्यात येणार आहे.
- रॉबिन हूड आर्मी सोलापूर
७७७४०२४९६७