करमाळा प्रतिनिधी
शहरातील पेठेतून मोटार सायकलीचा धक्का लागण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली असता विशिष्ट महापूरूषांचा टि शर्ट घातलेला पाहून चाॅपर व लाथा बूक्कयाने मारहाण करणा-या ठाकरे गटाचा तालुकाप्रमुख सुधाकर लावंड व त्यांच्या सहकार्यांवर गून्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन नागेश कांबळे यांच्या माध्यमातून सिद्धार्थ नगर येथील रहिवासी व पिडीत तरूणांनी निवेदना द्वारे करमाळा पोलिस स्टेशन कडे करण्यात आली आहे. यावेळी शेकडो तरूण पोलिस ठाण्यात जमा झाले होते.
निवेदनात सूधाकर लावंड व सहका-यांचे अवैध धंदे , बेकायदा सावकारी धंदे,अतिक्रमण इ असून स्वतःच्या तालमीच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रकार होत असून याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे.