सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 'आयबीएम कोडनेक' या कंपनीच्या भरती प्रक्रियेवर आधारित ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली.'आयबीएम कोडनेक' ही सॉफ्टवेअर कंपनी असून या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी असतात.याप्रसंगी सिंहगड महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागातील माजी विद्यार्थी ऋषीकेश मगर आणि सानिका शिर्के यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सानिका शिर्के व ऋषीकेश मगर हे 'आयबीएम कोडनेक ' या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहेत. या कार्यशाळेसाठी कॉम्प्युटर विभागातील अंतिम वर्षातील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले,कॉम्प्युटर विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय गंधमल, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सुरज धनवे उपस्थित होते.