शिवरत्न पब्लिक स्कूल गादेगाव मधील विद्यार्थ्यांनी दिपावली निमित्त बनवीले आकर्षक आकाशकंदील
गादेगाव प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांच्या मध्ये विविध कला गुण जोपासले जावेत या उद्देशाने विविध अशा स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे कलागुण जोपासण्याचे काम शिवरत्न स्कूल करत आहे .टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू कशा बनवले जातात याविषयी विद्यालयातील सहशिक्षक नेहमीच मार्गदर्शन करत असतात.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विविध सण ,उत्सवांचे महत्त्व वाढावे यासाठी प्रत्येक सणाचे विशेष आयोजन केले जाते .दीपावली निमित्त आकाश दिवा बनवण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले. यासाठी सहशिक्षक वर्षा मोरे ,शितल मस्के, शितल बागल, मोनाली गायकवाड, मसरूद्दीन पटेल, सिमा रकटे आदींनी मार्गदर्शन केले . सर्व विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी आभिनंदन केले.