भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहुदूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी विशेष सत्कार म्हणून सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याच्या नूतन संचालक पदी सुनिल पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल शिंदे,शंकर गवळी, जयश्री लोखंडे , उमर शेख ,सौ. बुरांडे तर उपाध्यक्ष- रघुनाथ पवार, शिवाजी लोखंडे, सौ.गवळी, सौ.कुचेकर, भिमराव शिंदे यांची निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवर सरपंच राजीव पाटील उपसरपंच .सविता लोखंडे ,ग्रा पं सदस्य रणजित जाधव,नितीन शिंदे, मुसा शेख, प्रविण गायकवाड, सचिन कुचेकर , बापू बुरांडे,दत्तात्रय लोखंडे,ग्रामविकास अधिकारी वाघमारे,ग्रामपंचायत कर्मचारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.