भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणी येथील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाळवणी ते चिकमहुद पायी दिंडी सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मराठा आरक्षण बाबत घोषणा देत पायी दिंडी काढली.
यावेळी चिकमहुद येथे जाऊन आमदार शहाजीबापू पाटील यांना आरक्षणाबाबत आवाज उठवण्या संदर्भात विनंती करून निवेदन देण्यात आले.
यावेळी आ. शहाजी बापू पाटील म्हणाले की आपण राज्य सरकार कडे मराठा आरक्षण बाबत आग्रही भूमिका मांडली आहे व यापुढे ही आरक्षण मिळेपर्यंत सर्व प्रयत्न करणार आहे.
यामध्ये मराठा समाजातील सर्व तरुण, युवक,महिला सहभागी झाल्या होत्या.