सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय क्रीडा परिषद व नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रॉजर्स इंग्लिश मिडीयम स्कूल, रंगभवन येथे झालेल्या शालेय नेटबॉल स्पर्धेत नेताजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षीय मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.या संघांची बारामती येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.प्रशालेच्या १४ वर्षे मुलींच्या संघाने द्वितीय ,१७ वर्षे मुलींच्या संघाने तृतीय तर १९ वर्षे मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविले.
विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या १९ वर्षीय मुलींचा संघ- अमूल्या मासपत्री, शितल महामुनी, अश्विनी पेगडयाल,साक्षी बेदरकर, प्रणिती वडशेरला, रंजना जिंदम, रेखा भोसले , लक्ष्मी भोसले, स्वाती देवकर ,समृद्धी कोकुल, सौम्या बिराजदार ,अश्विनी पवार सर्व खेळाडूंना क्रीडा प्रमुख विठ्ठल कुंभार ,सुर्यकांत बिराजदार , अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, प्राचार्य रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदींनी अभिनंदन केले.