पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर नगरपालिका हद्दीतील इसबावी येथील मोहसिन विद्यालय च्या पाठीमागे रस्ते मध्ये इलेक्ट्रीक पोल आहेत,2018 ला आषाढीवारीमध्ये वारकरी यांची गाडी पोलवरती आदळुन संपुर्ण LT लाईन तुटुन खाली पडली होती.
त्यावेळी खुप मोठा अपघात झाला असता,परंतु सुदैवाने अपघात टळला,परंतु आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने सदर बाब नपा अधिकारी यांचे निदर्शनास आणुन दिली ,सदर अधिकारी यांनी सदर कामाची वर्क ऑर्डर ठेकेदार काळे यांना दिली ,पण काळे हा ठेकेदार कोणत्या तरी पुढारी यांचा गुलाम व नगरपालिकेचा जावाई असल्या सारखे आज आठ ते दहा महिण्या पासुन आम्हाला अधिकारी व ठेकेदार नादी लावत आहेत,ठेकेदाराला अधिकारी मिठ मोहरी लावुन चाटत आहेत,जणु काही ठेकेदार हा अधिकारी यांचा पालन पोषण करत असले सारखे अधिकारी आम्हाला उत्तर देत आहेत,जर ठेकेदार काम करत नसेल तर त्याला हाकलुन द्याना,त्याला उरावर घेऊन नाचवता कशाला ?
आमच्याशी अधिकारी यांनी राजकारण करु नये,काम कामाचा गुरु आहे,जणतेच्या हिताचे काम करण्यात कोणता अधिकारी बाधा आणत असेल तर अधिकारी यांचे लाड पुरवायला जणता रिकामी नाही.उद्या जर काम नाही चालु झाले .तर आम्ही कोणाला कसे काळे फासायचे व ते पण जिल्हाधिकारी यांचे मिटींग मध्ये ते बघु.जणतेच्या जिवाची काळजी कोण घेणार ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
नागेश पवार जिल्हाअध्यक्ष आम आदमी पार्टी झाडु सेना