पंढरपूर प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवार दिनांक २२ ऑगस्ट २०२३ ते २६ ऑगस्ट २०२३ या कालावधीत "कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅमिंग ट्रेनिंग" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या "कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅमिंग ट्रेनिंग" या कार्यशाळेत प्रा. सुमित इंगोले यांनी सी, सी प्लस प्लस या प्रोग्रॅमिंग लँग्वेज वरील सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात शिक्षण घेत असताना कॅम्पस प्लेसमेंट निवड होणेसाठी मदत होणार आहे. या कार्यशाळेत ४० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्री गणेश कदम, प्रा. अमोल कांबळे, राजाराम राऊत आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.