पंढरपूर प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या पुणे येथील विभागीय डॉजबॉल स्पर्धेमध्ये शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव मधील सतरा वर्ष वयोगटातील मुलींनी सिल्वर मेडल मिळवले या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रशालेमध्ये मेडल घालून मनसे महाराष्ट्र राज्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सर्व विद्यार्थिनींना सिल्वर मेडल परीधान करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे असे मत दिलीप बापू यांनी व्यक्त केले. विद्यार्थी दशे पासूनच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणारे गुण जोपासले पाहिजेत भविष्य काळामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी अभ्यास हे एकमेव शस्त्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी स्वतः विद्यार्थी दशेमध्ये अनुभवलेले अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत मोकळ्या मनाने सांगितले.
या गौरव कार्यक्रमासाठी मनसेचे अनिल अप्पा बागल ,संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे ,सहशिक्षक राजेंद्र भोसले ,सोमनाथ भुईटे, वर्षा मोरे ,शितल बागल ,अजय मोरे ,शितल मस्के, मोनाली गायकवाड ,सीमा रकटे, मसरूद्दीन पटेल, संतोष पवार ,नागेश कांबळे व विद्यार्थी,खेळाडू उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भोसले यांनी केले दीपक देशमुख यांनी आभार मानले