पंढरपूर प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (स्वायत्त) येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी वेगवेगळ्या तज्ञांचे व्याख्यान आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर चे प्रांत अधिकारी गजानन गुरव यांनी आपल्या उद्घाटनपर मनोगतात म्हटले की, स्पर्धा परीक्षेची तयारी हे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने काळातच करणे अपेक्षित आहे. जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. त्याने आपली ध्येय योग्य वेळी निश्चित केले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी ही काळाची गरज आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या सप्ताहाचे पहिले पुष्पगुफताना विजयश्री अकॅडमीचे संचालक प्रा. जॉर्ज क्रुझ यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कोण कोणत्या विषयाचा कशा पद्धतीने अभ्यास करावयाचा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑब्झर्वेशन, रीडिंग, रायटिंग या कौशल्याचा उपयोग करावा. कमीत कमी कालावधीत उत्तम प्रकारे यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये अभ्यासाचे सातत्य असणे आवश्यक आहे. त्याचे महत्त्व त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणातून विद्यार्थ्यांसमोर कथन केले विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी चांगल्या प्रकारे निरसन केले. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी चालू घडामोडी साठी वर्तमानपत्राची आवश्यकता विद्यार्थ्यांना पटवून दिली. वर्तमानपत्रातील कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी भूषविले महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनासाठी नामवंत तज्ञांच्या व्याख्यानाचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. असा विश्वास त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुशील शिंदे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. आरेकर प्रा, गायकवाड, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष मते यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपस्थित यांचे आभार प्रा. दत्ता खिलारे यांनी मानले.