पंढरपूर प्रतिनिधी
सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी लि., या कारखान्याचा गाळप हंगाम २०२३ - २४ चा 13 वा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ ह.भ.प. मा. अडव्होकेट जयवंत बोधले महाराज धामणगांवकर यांचे शुभहस्ते तसेच कारखान्याचे मुख्य प्रवर्तक व धनश्री परिवारचे संस्थापक .प्रा.शिवाजीराव काळुंगेसर, चेअरमन सौ. शोभाताई शिवाजीराव काळुंगे, सौ. स्नेहलताई मुदगल, सौ. दिपाली पाटील, मा. श्री. सुयोगभैया गायकवाड, मा. श्री. दत्तात्रय सुर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौ. राजलक्ष्मी रविराज गायकवाड यांचे उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी विधीवत होमहवन पुजा कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी गायकवाड व मा. संचालक श्री. सुयोगभैया गायकवाड यांचेहस्ते करणेत आला.
सदर बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळ्यास उध्दव बागल, अविनाश भाऊ चव्हाण, धर्मराज खेडेकर, संजय चौगुले, बिभीषण ताड, धनश्री मल्टीस्टेटचे जनरल मॅनेजर रमेश फडतरे, रवि शिंदे, सौ. सुनिता सावंत तसेच सिताराम महाराज साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर हणमंत पाटील, चिफ इंजिनिअर एस.बी.रोंगे, प्रशासन अधिकारी श्री. डी. एम्. सुतार, चिफ केमिस्ट व्ही. एस. नागणे, मुख्य शेती अधिकारी श्री.पी.जी. शिंदे, को जन मॅनेजर ए. बी. गाजरे, सिव्हील इंजिनिअर आर. एस. वायदंडे, पर्चेस / सेल्स मॅनेजर एन. पी. कोठावळे, पर्चेस ऑफीसर आर. एन. चेळेकर, स्टोअर किपर डी.जे. नागणे, ई.डी.पी. मॅनेजर टी. बी. पांढरे, फायनान्स अकौंटंट व्ही. एन्. भोसले यांचे सह ऊस पुरवठा सभासद शेतकरी, तोडणी वहातुक कंत्राटदार, कारखान्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.