इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम
पंढरपूर प्रतिनिधी
कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आवश्यक असणारे स्किल व त्यासाठी करावी लागणारी तयारी तसेच कंपनी कडून असणाऱ्या अपेक्षा व सध्याचा अभ्यासक्रमांमधील ज्ञान यामधील दरी कशी कमी करावी, यशस्वी अभियंता होण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे अश्या अनेक मुद्द्यांवर कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शित करण्यात आले. महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील माजी विद्यार्थी सुशांत वास्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुशांत वास्कर हे सध्या नामांकित कंपनी मध्ये मोठ्या पदावर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अश्या प्रकारच्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भविष्यामध्ये ही असे अनेक उपक्रम राबविणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी दिली. यासंदर्भात बोलताना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख प्रा. एस एम लंबे म्हणाले की विद्यार्थ्यांना अवगत असलेले तंत्रज्ञान व कॉर्पोरेट क्षेत्रातील अपेक्षा यांची योग्य सांगड विद्यार्थी दशेमध्ये घातली तरच भविष्यातील यशस्वी अभियंते निर्माण होऊ शकतात. कर्मयोगी इन्स्टिट्यूट ही नेहमीच विद्यार्थि केंद्रित उपक्रम राबवत असते. महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातर्फे भविष्यामध्ये ही असे अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर च इतर कौशल्ये ही आत्मसात होतील याची काळजी घेतली जाईल असे सांगून त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
सदरच्या कार्यक्रमासाठी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजिस्ट्रार जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशिष जोशी, विभागप्रमुख प्रा. एस एम लंबे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी प्रा. सुशील कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.