मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व येथील श्री समर्थ विद्यालय आणि श्रीमती लक्ष्मीबाई वळंजू प्राथमिक शाळेत आरे कॉलनी येथील आदिवासी पाड्यातून शिकायला येणाऱ्या १२० आदिवासी विद्यार्थ्याना नुकतीच रॉबिनहूड आर्मी या संस्थेच्या वतीने किराणा किट व शैक्षणिक वस्तू देऊन सहकार्य करण्यात आले. पाड्यातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांचे पालक हे डेली वेजेस वर काम करणारे असून यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांना काहीतरी मदत मिळावी यासाठी जोगेश्वरी येथील सामजिक कार्यकर्ते गणेश हिरवे नेहमीच पुढाकार घेत असतात.या कामासाठी देखील हिरवे सरांनी पुढाकार घेऊन रॉबिनहुड संस्थेच्या पदाधिकऱ्यांशी बोलून समर्थ शाळेतील या मुलांची दयनीय परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.ही मुल दैंनदिन
सुविधांपासून वंचित असली तरी अभ्यासात व खेळात खूप हुशार आहेत.यावेळी सेकंडरी चे मुख्यध्यापक मधुकर पोर्लेकर सर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुनीता निंबाळकर मॅडम, रॉबिनहुड चे अक्षय संघवी, स्मिता गांधी, रवी कुलकर्णी, भारत पांचाल, प्रीयांश जैन, प्रीती मॅडम, समर्थ संस्थेचे मानद सचिव सुनील नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.मदत मिळाल्याने मुल व त्यांचे पालक आनंदित होते..या उपक्रमासाठी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे आर्थिक सहकार्य लाभले होते.समर्थ शाळेतर्फे रॉबिनहुड आर्मी, हिरवे सर आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक यांचे आभार मानण्यात आले. सुत्रसंचलन राजापकर सर यांनी केलं.