खडकी प्रतिनिधी
आगरवाल समाज खडकी आणि अपना वैश्य समाज यांच्या वतीने भव्य सामूहिक कन्या पूजन समारंभ मोठ्या हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला. यावेळी एस.व्ही.एस. शाळेच्या पहिली ते चौथी मधील १९१ विद्यार्थिनी आणि ११ विद्यार्थ्यांचा मोठ्या भक्तीभावाने पूजन करण्यात आले, त्यांना भेटवस्तू देऊन भोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थित त्यामध्ये एकच चैतन्य पसरले होते.
एस.व्ही.एस. शाळेतील पहिली ते चौथी मधील १९१ विद्यार्थिनींचा आणि ११ विद्यार्थ्यांचा भव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. शाळेतून आगरवाल समाज भावनात सर्व कन्यारूपी विद्यार्थिनींचे आगमन झाले सर्व कन्याचे पाय दुध आणि पाण्याने धुण्यात आले, त्यांची पूजा करण्यात आली, त्यावेळी त्यांना भेटवस्तू देऊन त्यांना भोजन करण्यात आले. बेटी बचाव, बेटी पढाव या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र फडके आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेला मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, शाळेचे अध्यक्ष फ्रान्सिस डेव्हिड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन आगरवाल समाज खडकीचे अध्यक्ष दीपक अग्रवाल, पवन अग्रवाल, राहुल अग्रवाल, मनीष गोयल, प्रमोद बन्सल यांनी केले. याप्रसंगी सुभाष अग्रवाल,संजय अग्रवाल, शामसुंदर अग्रवाल, वैश्य समाजाचे अध्यक्ष सुधीर अग्रवाल, देवीलाल जलाल, अनिल अग्रवाल, घनश्याम अग्रवाल, निरुपमा अग्रवाल, अनिता अग्रवाल, रुक्मिणी गोयल यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीक्षम घेतले. कार्यक्रमात आभार प्रदर्शन राहुल अग्रवाल यांनी केले.