सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार धाये , पर्यवेक्षिका सुमन बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्येष्ठ प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी ,प्रा.दत्तात्रय बिराजदार , ज्येष्ठ शिक्षक अरुण हत्ताळी , प्रकाश कारभारी , रवि माळी , श्री धुंडप्पा राजमाने , बसवराज गुंटद , चंद्रकांत स्वामी ,.ललिता मठपती ,सेवक प्रतिनिधी ऐवळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.