बदलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पहिले माहेरघर म्हणजेच अंजलीनगर,बदलापूर येथील माहेरवाशीण,येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दररोज देवीची आरती,गरभानृत्य,गायन,भजन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.त्याच अनुषंगाने विलेपार्लेच्या"भावसुगंध"नवदुर्गा ग्रुपने महालक्ष्मी गीत,भजन,जोगवा असे संगितमय भजन आपल्या सुरेल आवाजात सादर केले.
याप्रसंगी जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने "भावसुगंध"नवदुर्गा ग्रुपला संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर व माहेरवाशीण संस्थेच्या संस्थापिका-संचालिका प्रभाताई शिर्के यांच्या हस्ते आकर्षक 'नवदुर्गा सन्मानपत्र'समारंभपुर्वक प्रदान करण्यात आले.तसेच भावसुगंधच्या कर्तृत्ववान महिला शमा आठल्ये,कुसुम माने,स्नेहा बाळ,अर्पणा जोशी,शर्मिला वैद्य,सुनंदा जोशी यांना जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने नवदुर्गा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी प्रास्ताविक केले.व माहेवाशीणच्या संचालिका प्रभाताई शिर्के यांनी आभार मानले.