सोलापूर प्रतिनिधी
श्री.बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्था संचलित दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र धोत्री येथील श्री भगवती गौरीमाता शिक्षण संकुलात माजी विद्यार्थी शिवशंकर केदार नवले याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात मानवरांच्या शुभहस्ते परमपूज्य श्री.होटगीश्वर महास्वामीजींच्यां प्रतिमा पूजनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य माननीय श्री नंदकुमार धाये सर पर्यवेक्षिका सुमन बिराजदार व प्राध्यापकवृंद उपस्थित होते. सदर प्रसंगी मुलींच्या स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तदनंतर माजी विद्यार्थी शिवशंकर केदार नवले याची भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल संकुलाच्या वतीने प्राचार्य श्री.नंदकुमार धाये सर यांच्या हस्ते शाल फेटा ग्रंथ व गुरु महाराजांची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकेतून प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी शिवशंकर केदार नवले यांचा आई-वडिलांनी अत्यंत बिकट परिस्थितीतही जिद्दीने आपल्या मुलांना शिक्षण दिले त्या मातापित्यांचा कार्याचा गौरव केला. त्यानंतर सत्कारमूर्ती शिवशंकर नवले यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाला,"ध्येय निश्चित केल्यानंतर यश नक्कीच मिळते.जिद्द, चिकाटी, खडतर मेहनत याशिवाय प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेची तयारी खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले".अध्यक्ष पदावरून बोलताना
प्राचार्य नंदकुमार धाये म्हणाले, कि "विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील एक प्रामाणिक व कष्टाळू मुलगा ध्येय निश्चित करुन यश प्राप्त केल्याने शाळेला व गावाला अभिमानाची गोष्ट आहे.सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडांगणातील विविध खेळाचा सराव करावा व जिद्द चिकाटी,परिश्रमाच्या जोरावर शिवशंकर नवले याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याप्रती वाटचाल करावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन कुमारी शिवानी बिराजदार कुमारी भाग्यश्री बिराजदार यांनी केले,तर आभार प्रदर्शन कुमारी साक्षी गायकवाड हिने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण संकुलातील कर्मचारी वृंदांचे बहुमोल सहकार्य लाभले.सर्वच कर्मचारी वृंदांनी व विद्यार्थ्यांनी शिवशंकर नवलेला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.