पंढरपूर प्रतिनिधी
राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.