भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री शाकंभरी देवी मंदिराच्या आवारात उद्या सोमवार दिनांक ९/१०/२०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता गुणवंत विद्यार्थी, शासकीय सेवेत नवीन नियुक्ती व पदोन्नती मिळवलेले अधिकारी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक मनोज गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अति मुख्य कार्यकारी अधिकरी इंद्रजित देशमुख उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सेवानिवृत्त अति मुख्य कार्यकारी अधिकरी इंद्रजित देशमुख यांचे स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमास सर्व विध्यार्थी, पालक,अधिकारी व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.