सावर्डे प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर
सावर्डे लायन्स क्लब ऑफ सावर्डे चे सदस्य ला.डॉ. अजित गावकर यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब सावर्डे यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिलवली तर्फ वेळंब शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर उपक्रमासाठी ला.डॉ.अजित गावकर यांचे महत्वाचे योगदान लाभले. सदर कार्यक्रमास लायन्स क्लब चे अध्यक्ष डॉ.निलेश पाटील, सचिव ला.सतीश सावर्डेकर,खजिनदार ला.अरविंद भंडारी, MJF ला.गिरीश कोकाटे,ला.डॉ.वर्षा खानविलकर,ला.डॉ.कृष्णकांत पाटील,ला.सीताराम कदम, ला.विनय कदम ,शाळेचे मुख्याध्यापक श्री.कोकमकर सर,श्री.उमाकांत भंडारी सर,श्री.उकार्डे सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सदस्य आणि विदयार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आले.
नंतर शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले,तसेच सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.तसेच सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत शाळेतील एक मुलीला दत्तक पालक योजनेचा लाभ देण्यात आला. सदर वेळी अध्यक्ष ला.डॉ.निलेश पाटील यांनी लायन्स ही एक इंटरनॅशनल संस्था असून या माध्यमातून लायन्स क्लब यांच्या सामाजिक कार्य करत आहे.आजपर्यंत क्लब आरोग्य आणि शिक्षणावर अनेक उपक्रम राबविले आहेत, असे नमूद केले.तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले संगीतमय स्वागत हे कौतुकास्पद आहे.असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
शेवटी ला.डॉ.अजित गावकर यांचा केक कापून शाळेच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत भंडारी यांनी केले