वैभव केंगार राम अनवते सोपान मोरे यांची विठूरायाच्या चरणी स्वर पूजा
पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवाची सुरुवात प्रतिवर्षाप्रमाणे दिमाखात संपन्न होत असताना कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब,वैभव केंगार ज्ञानेश्वर दुधाणे राम अनवते सोपान मोरे ज्ञानेश्वर खरात यांच्या उपस्थितीत विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून गायनसेवेला सुरुवात झाली.
गायक वैभव केंगार राम अनवते सोपान मोरे यांनी राग पूरीया धनाश्री मध्ये पायलीया झनकार या मध्य तीनतालात गाऊन अभिजात शास्त्रीय संगीताने करत नंतर वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र जय जय रामकृष्ण हरी सुरुवात करत सुर निरागस हो,गोविंद गोविंद मना लागलीया छंद,आता कोठे धावे मन,वेढा वेढा रे पंढरी,माझे माहेर पंढरी,हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा,अशा अनेक संतरचना गाऊन वातावरण भक्तिमय झाले होते,शेवटी धन्य भाग सेवा का अवसर पाया,व रामकृष्ण गोविंद नारायण हरी,या भैरवी ने पांडूरंगाचा गजर करत कार्यक्रमाची सांगता झाली.त्यांना तितकीच सुंदर समर्पक तबला ज्ञानेश्वर खरात पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ वैभव जोशी यांनी केली.
यावेळी पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहुन स्वरमैफिलीचा आनंद घेतला.संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी आदी अधिक परिश्रम घेत आहेत,२६तारखेपर्यत चालणाऱ्या या संगीत महोत्सवास सर्वांची उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने करण्यात येत आहे.