पंढरपूर प्रतिनिधी
सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये मुलांची जडणघडण होत असताना नातवंडांना आजी आजोबाचे न मिळणारे प्रेम त्यांना सतत मिळावे व त्यातून मुलांचा सर्वांगीण विकास साधता यावा.आपले आजी आजोबा हे निस्वार्थपणे आपल्या कुटुंबाची नातवांची काळजी घेत असतात सर्वांना योग्य मार्ग दाखवत असतात याच भावना मुलांच्या मनात रुजवणे कामी संस्थापक सचिवा सौ. सुनेत्राताई पवार यांचे संकल्पनेतून श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय पंढरपूर या प्रशालेत आजी आजोबा दिन व आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिन मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अब्दुल कलाम यांचे प्रतिमेस प्राचार्या सौ. नंदिनी गायकवाड व आजी आजोबा प्रतिनिधी श्री. विष्णुपंत विठ्ठल रेडे पाटील.यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून व आजी आजोबांना पुष्पगुच्छ व तृणधान्य पॅकिंग भेट देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कृषी अधिकारी सौ. स्वाती गवळी या तृणधान्याचे महत्त्व सांगताना म्हणाल्या की आपल्या रोजच्या आहारात तृणधान्य असायला हवीत कारण ते पौष्टिक व पचनास हलकी असतात.तसेच शेतकऱ्यांनी हवामानास अनुकूल व पाणी कमी लागणारी पिके आपल्या शेतात कायम घ्यावीत तसेच पिकांमध्ये विविधता आणण्याचे आवाहन केले.
प्राचार्या सौ. नंदिनी गायकवाड म्हणाल्या की मुलांनी आपल्या आहारात पिझ्झा बर्गर टाळून तृणधान्य निर्मित खाद्यपदार्थांचा वापर करावा. मुलांनी आजी आजोबांचे संस्कार जोपासून एकत्र कुटुंब पद्धतीत आजी आजोबांचे प्रेमात एकत्र राहण्याचा सल्ला दिला.
तसेच या कार्यक्रमात पंढरपूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या माऊली दहीहंडे, ओंकार सुळ ,मुक्ता जुमाळे ,आदित्य कवडे, दिव्या यादव यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी डुबल यांनी केले.तर आभार सविता लोखंडे यांनी मानले .
कार्यक्रमासाठी प्रतापराव पाटील यांचे सह 36 आजी आजोबांनी उपस्थिती दर्शवली .कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी बोडके कुमुदिनी सरदार फरहाणा कादरी यांनी विशेष परिश्रम घेतले.