सोलापूर प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत (11) मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहे. मॅरेथॉन स्पर्धा रविवार सकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत आयोजित करण्यात आलेले आहे.
स्पर्धचे ब्रीदवाक्य पी. एम. स्कील रन असे निश्चित केले आहे. जिल्हयातील सर्व औ प्र संस्थेत आयोजित मॅरेथॉन स्पर्धमध्ये नजिकच्या सर्व शाळेतील व महाविदयालयातील विदयार्थीनी उर्स्फृतेने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. एस. धुमाळ यांनी केले आहे.