वाडी कुरोली प्रतिनिधी
गणेशउत्सवानिमित्त वसंतराव काळे प्रशालेत वसंत व्याख्यानमालेचे आयोजन मुलांच्या यशाने आई-वडिलांच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद हे मुलांचे सर्वात मोठे यश आहे असे प्रतिपादन प्रा.विठ्ठल साळुंखे यांनी केले ते वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली धोंडेवाडी येथे आयोजित गणेशउत्सव वसंत व्याख्यानमालेत बोलत होते.
यावेळी विचारपीठावर प्रशालेचे प्राचार्य दादासो खरात पर्यवेक्षक सत्यवान काळे संस्कृतिक विभाग प्रमुख संजय कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना साळुंखे म्हणाले की आई-वडील हे जगातील सर्वात महान तीर्थ असून आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सदैव चांगले विचार आचरणात आणून आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असणे व त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हेच आपले कर्तव्य आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत रहा चांगली माणसे आयात करता येत नाहीत ती आपल्याच मातीत जन्माला यावी लागतात . थोर महापुरुषांचे विचार आचरणात आणावेत बाप आणि मुलगा यांच्यात सुसंवाद असणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास व सुसंस्कार याविषयी मार्गदर्शन करताना छोटी छोटी उदाहरणे देत आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून विद्यार्थ्यांच्या मनावर हलक्या फुलक्या शैलीत त्यांनी सुसंस्कार रुजवले.
गणेश उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना आनंददायी बौद्धिक मेजवानी मिळावी म्हणून वसंतराव काळे प्रशालेने राबवलेल्या व्याख्यानमालेचे त्यांनी कौतुक केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.समाधान काळे यांनी केले व सांस्कृतिक विभाग सहाय्यक दिलीप लिंगे यांनी आभार मानले