अकलूज प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग आयोजित दिव्यांगाच्या दारी अभियान जिल्हास्तरीय कार्यक्रम सोलापूर येथे विविध योजनांची माहिती व लाभ वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू तथा अध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य कार्यक्रमास उपस्थित आमदार सुभाष देशमुख जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद , भा प्र मनीषा आवळे मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर शितल तेली उगले महानगरपालिका सोलापूर सुनील खामितकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सोलापूर संदीप कोहीनकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचे उपस्थितीत पार पाडला जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते. दिव्यांग कल्याण मंडळ अधिकारी यांचे तर्फे बच्चू कडू यांना सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तुकाराम साळुंखे पाटील संघटक सचिव सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना संघटना संघटक उपस्थित होते.
जिल्ह्यातून अनेक दिव्यांग अबाल वृद्ध उपस्थित होते मार्गदर्शनपर जिल्हाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून शासनाच्या सवलती व उपायोजना माहितीचा लाभ सर्व दिव्यांग लोकांनी घ्यावा आपली सर्व कागदपत्रे जमा करावेत असे सूचना देऊन संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचीही मार्गदर्शन लाभले. यावेळी राज्यातून प्रहार संघटनेची अध्यक्ष पदाधिकारी सोलापूर जिल्हा शहर अजित भाऊ कुलकर्णी व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते प्रत्येक दिव्यांगाचे फार्म भरून घेऊन तपासणीसाठी डॉक्टर व त्याचे सर्व स्टॉप यांनी परिश्रम घेतले सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक ग्रामपंचायत मधून ग्रामसेवक ग्राम विस्तार अधिकारी सह अनेक दिव्यांग उपस्थित होते