गायन वादन आणि नृत्य तिन्हीं कलेचा संगम कलारसिकांनी अनुभवला
पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित श्री गणेशोत्सव संगीत महोत्सव सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर , कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरं पुष्प गुंफताना सदस्या शकुंतला नडगिरे मॅडम ,उदय साटम, ज्योती साटम, दर्शन साटम,जयेश निकम यांच्या शुभहस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरुवातीला गणेश वंदना गाऊन श्रीगणेशाला नमन करत गायक दर्शन साटम,संगेश पवार,शुभमं मस्के, श्रध्दा साळवी, उमा गावंड,व्यवस्थापक जयेश निकम नृत्य दिग्दर्शक संदीप कांबळे, यांच्या सुमधुर गायनाने वादनाने आणि नृत्याने कलारसिक चिंब होत पहाटेची भूपाळी, कानडा राजा पंढरीचा,दळीते दळण, उजळून आलं आभाळ,मराठी पाऊल पडते पुढे, ढगाला लागली कळ,बाई मी केळी वाली, तुझ्या रुपाच चांदणं,झिंगाट,जय जय महाराष्ट्र माझा,आईचा गोंधळ, पोवाडे,अशा विविध महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या मराठमोळ्या कार्यक्रमाला पंढरपूर कलारसिकांनी ही तितकाच उत्साहात प्रतिसाद दिला.
या सुंदर अशा मराठमोळी परंपरा कार्यक्रमाला साथसंगत ही तितकीच अप्रतिम आणि दमदार होती, शेवटपर्यंत उपस्थित कलारसिकांनी दाद देत गायन वादन नृत्य सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेतला, गणेशोत्सव संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी वर्ग आदी अधिक परिश्रम घेत आहेत.
उद्या शुक्रवार रोजी विजयकुमार बनसोडे यांचे शास्त्रीय गायन व शनिवार रोजी ख्यातनाम अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जेमनिस यांच्या कथ्थकरंग हा नृत्याविष्कार पाहण्यासाठी सर्व पंढरपूरकर कलारसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात येत आहे.