पंढरपूर प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज पंढरपूर येथे सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवाजी महाराज चौकात आंदोलन करताना सरकार विषयी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पंढरपूर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.