पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित,श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,सुस्ते प्रशालेतील इयत्ता बारावी मधील 19 वर्षे वयोगटात यश तानाजी मगदूम याने जिल्हास्तरीय 65 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.तर 70 किलो वजनी गटामध्ये ग्रीको रोमन कुस्ती क्रीडा प्रकारामध्ये पृथ्वीराज सुनील शिंदे यानेही प्रथम क्रमांक मिळवला आहे. या दोघा खेळाडूंची विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.त्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक गणेश पाटील,धनाजी देठे यांचे मार्गदर्शन तर नितीन गावडे यांचे सहकार्य लाभले.
त्यांच्या यशाबद्दल प्रशालेचे प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे, पर्यवेक्षक रणजित शिनगारे संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, सचिव ॲड.वैभव टोमके, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, जेष्ठ संचालक दिलीप घाडगे, अनिरुद्ध सालविठ्ठल, आप्पासाहेब चोपडे, मुकुंद देवधर, विजयकुमार माळवदकर सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.