सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम हिंदी साहित्यिक महान लेखक मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य रविशंकर कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.व्यासपीठावर पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, प्रा. लक्ष्मी कुरापाटी, संगप्पा दसगोंडे, राजकुमार मरगुरे,सिद्धाराम कुंभार, ज्ञानेश्वर म्हेत्रे, शिवशंकर कुंभार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शुभम पाटील, कांचन शिंदे, अक्षया सुंकनपल्ली, प्रतीक्षा हंचाटे, पूर्वा रेके, शुभम सरवदे, रक्षिता सुकंनपल्ली, प्रचिता श्रावण, गायत्री दुधभाते,सोनाक्षी मेरगू, श्रद्धा मागनूर, लावण्या मिसालोलू ,मयुरी पोषम, सपना कंठली, सत्यसाई मायकुंटे, देवराज नडगेरी, सृष्टी बोरामणी, महालक्ष्मी मिसलोलू, भावना येमुल,रम्या गुंडेटी, उमा बिटला व साक्षी कुरापाटी या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचा महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल बाबा यांनी केले तर प्रणाली रॅका यांनी आभार मानले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.