चिंचणी प्रतिनिधी
उजनी कण्हेर धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रशनासाठी अप्पर जिल्हाधिकारी श्री तुषार ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व धरणग्रस्तांचे प्रतिनिधी यांची आढावा बैठक चिंचणी येथे घेण्यात आली. यावेळी सदर बैठकीमध्ये प्रलंबित प्रशनांच्या अनुषंगाने चर्चा करत असताना आ. बबनदादा शिंदे यांनी धरणग्रस्तांचे प्रश्न गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. यामध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता नसून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा प्रश्न आहे. यासाठी सततचा पाठपुरावा करून संबंधित प्रश्न येत्या काळामध्ये कालबद्ध कार्यक्रम आखून सोडवणार आहे. सदरच्या बैठकीमध्ये धरणग्रस्त राहत असलेल्या गावठाणातील देय नागरी सुविधा करणे यामध्ये गाव पोहोच व अंतर्गत रस्ते करणे, पाणीपुरवठा, अपूर्ण विद्युतीकरण, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा खोली व कंपाऊंड बांधणे, गटर यासह इतर सुविधांचे स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करून सदर अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यता साठी शासन स्तरावर पाठवणे व त्यांना तात्काळ मान्यता घेण्याचे ठरवण्यात आले. स्वतंत्र महसूल गाव व स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचे प्रस्ताव तयार करणे.वहिवाट अडथळा दूर करणे. तहसीलदार यांनी नवीन शर्त शेरा कमी करणे कामी कॅम्प लावण्याचे ठरले. महसूल गाव नसल्यामुळे पंधरावा वित्त आयोगाचा निधी खर्च करता येत नाही त्यासाठी आजोती, सुगाव भोसे, सुगाव खुर्द, बिटरगाव, टाकळी, उजनी वसाहत, या गावांचे महसूल गाव करण्याचे प्रस्ताव तात्काळ करण्याचे ठरले. धरणग्रस्तांच्या गावठाणातील खुल्या जागेवर असणारे अतिक्रमण दूर करण्याच्या अंतिम नोटिसा तहसीलदार यांनी देऊन अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. गावठाणची मोजणी करणे व त्यांच्या हद्दी कायम करण्यासाठी श्री ठोंबरे साहेब यांनी सदरचे काम हे शासकीय असल्यामुळे सदरची फी मागणी न करता त्या तात्काळ मोजणी करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, कुर्डूवाडी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर ,जिल्हा पुनर्वसन अधिकारी टोंपे , जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे , तहसीलदार सुशील बेल्हेकर, अप्पर तहसीलदार तुषार शिंदे, बीडीओ प्रशांत काळे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, पीएसआय दिलीप शिंदे , सुदीप चमारिया सोनार भूमी अभिलेख विनोद रणवरे तहसीलदार महेश पाटील इत्यादी अधिकारी व पंढरपूर माढा तालुक्यातील धरणग्रस्त प्रतिनिधी उपस्थित होते.यामध्ये अतुल खरात मोहन अनपट लक्ष्मण धनवडे बिभीशन गुटाळ आण्णा पाटील महावीर वाकसे नागेश झेंडे दादा साखरे रावसाहेब देवकर अमरजीत पवार हेमंत देवकर बाबासाहेब धुमाळ विजय पवार धरणग्रस्त प्रतिनिधी उपस्थित होते.
मा. अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी पंढरपूर या ठिकाणी दर गुरुवारी आढावा बैठक घेऊन प्रलंबित प्रशनांचा निपटारा करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे असणाऱ्या चार नायब तहसीलदार यांच्यावर याबाबत विभाग वार जबाबदारी देऊन हे प्रशन निकाली काढण्यासाठी तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्या.