मुंबई अध्यक्षपदी माजी सैनिक चंद्रशेखर सावंत, ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक व पत्रकार अनंत बोरसे तर पुणे जिल्हाप्रमुख म्हणून पत्रकार व गावगाथा चे संपादक धोंडप्पा नंदे यांनी स्वीकारली जबाबदारी
मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
जॉय सामाजिक संस्था मुंबई ही महाराष्ट्र मुंबई मधील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व एक अग्रगण्य संस्था म्हणून सर्वांना परिचित असून आतापर्यंत संस्थेच्या वतीने हजारो गोरगरीब, वंचित, आदिवासी, गोर गरीब व बिकट परिस्थितीत जीवन जगणाऱ्या लोकांना, विद्यार्थ्याना, वृद्धांना नेहमीच मदतीचा हात देण्यात येतो.खासकरून मागासलेला राहिलेला पालघर जिल्ह्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्याना, वृद्धांना वेळोवेळी मदत करण्यात येते. जॉय चे सभासद आणि लोकवर्गणीतून अनेक उपक्रम यशस्वी केले जातात. लॉकडाऊन काळातही जॉय सा संस्थेने उल्लेखनीय काम करून जवळपास सहा हजार कुटुंबांना किराणा किट, स्वचछता किट व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते.
आतापर्यंत संस्थेला अनेक पुरस्कार मिळालेले असून राज्यातील विविध भागातील तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक डॉक्टर, शिक्षक, पोलीस, आय टी प्रोफेशनल, सोशल वर्कर, पत्रकार, सेवानिवृत्त बँकर्स, सरकारी अधिकारी असे जवळपास १३० जण सध्या संस्थेत कार्यरत आहेत.
जॉयचे कार्यक्षेत्र राज्यात विविध ठिकाणी वाढत असून त्यानुसार निविन नियुक्त्या केल्याचे संस्थापक गणेश हिरवे यांनी सांगितले.बोरसे, सावंत आणि नंदे यांची नवीन नियुक्ती झाल्याने सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले आहे.