श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून सांस्कृतिक वारसा जोपासला जातोय
पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ख्यातनाम कथ्थक नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरीताई जमेनिस यांच्या कथ्थकरंगाने पंढरपूरकर कलारसिकांना मंत्रमुग्ध झाले.
सुरुवातीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे मॅडम, शर्वरी जमेनिस, निखिल पाठक,मनोज देसाई, वैष्णवी देशपांडे, यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून कथ्थकरंग कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरुवातीला शर्वरी जमेनिस यांनी कथ्थक चे विविध प्रकार त्यामध्ये आमद,परण, कविताछंद,विठ्ठल परण, महाकाली परण,आदी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध करत तृप्त केले, त्यामध्ये कृष्णलीला,लक्ष्मी ठोसर, हुबेहूब सादर करत टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत उदंड प्रतिसाद दिला,शेवटी कथ्थक,तबला,पखवाज, जुगलबंदीने अधिक रंगत भरला,त्यांना तितकीच अप्रतिम आणि दमदार साथसंगत तबला निखिल पाठक पढंत वैष्णवी देशपांडे हार्मोनियम आणि गायन मनोज देसाई, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केली.
यावेळी पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला,आणखी पुढे तीन दिवस चालणाऱ्या गणेशोत्सव संगीत महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात येत आहे.महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती कर्मचारी वर्ग आदी अधिक परिश्रम घेत आहेत.