पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य यांच्या सर्वसाधारण सभेत पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख व तेज न्युज चे संपादक प्रशांत माळवदे यांचा संत शिरोमणी श्री. नामदेव महाराजाचे १६ वे वंशज ह. भ. प. मुकुंद महाराज नामदास तसेच महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जाचे ) तथा अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती ,टोपी,नामदेव महावस्त्र,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला
पंढरपूर येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य यांची पहिली सर्वसाधारण सभा दिनांक ०३ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १० ते ०५ या वेळेत योगा भवन पंढरपुर येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी भारतातील १५ राज्यांतून प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्या सभेत अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नारायणराव पाथरकर , मुख्यसचिव जयसिंगपुर येथील महादेवराव खटावकर , महाराष्ट्र राज्य संघटक जळगाव येथील मनोज भांडारकर तसेच ओरीसा बंगाल येथून महेंद्र दर्जी , उत्तराखंड येथून राकेश आर्य , हरिद्वार हरियाणा येथून मुकेशजी नामदेव , मध्य प्रदेश येथून अरुण नामदेव, चेन्नई येथून महेंद्र तांडी, सुरत गुजरात येथून रमेश परमार , गोवा येथून रमेश भीमे , एस एस टोनी, श्रीमंती रेखा वर्मा , बलजीतसिंग खुरपा, राजपाल जी, अनिल गचके, नंदकुमार कोडनुसार, दिनकर पतंगे,बाळासाहेब आंबेकर, कैलास धोकटे , संतोष मुळे, राजेंद्र धोकटे, गणेश उंडाळे , जगन्नाथ म्हैंदरकर, दिलीप बंगाळे, दत्ता चांडोले, प्रसाद निकते, युवक संघटनेचे अध्यक्ष शैलेश धट, महेश गाणमोटे, माजी अध्यक्ष राजेश कपडेकर, ज्ञानेश्वर वडे, प्रथमेश परंडकर, दत्तप्रसाद निपाणकार, अक्षय चांडोले, अमर जंवजाळ, निलेश धोकटे,अनिल जवंजाळ, शिवकुमार भावलेकर आदि मान्यवर उपस्थित होते.