म्हसवड प्रतिनिधी सचिन सरतापे
धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून काही दिवसापासुन दहिवडी येथे धनगर समाज बांधव अमरण उपोषणास बसले आहेत या सुरू असलेल्या अमरण उपोषणाच्या समर्थनार्थ शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर2023 रोजी धनगर समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे
सदर मोर्चा हा सिद्धनाथ मंदिर,तहसील कार्यालय दहिवडी ते उपोषण स्थळ असा असणार आहे यामध्ये प्रामुख्याने सर्व समाज बांधव महिला भगिनी विद्यार्थी तसेच मेंढपाळ सर्व वर्गातील, सर्व स्तरातील समाजबांधव सहभागी होणार आहेत तरी धनगर समाजातील सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माण तालुक्यातील धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.