मराठा क्रांती मोर्चा मायणीत साखळी उपोषण
खटाव प्रतिनिधी
गेले अनेक वर्षे मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजातर्फे विविध आंदोलने करण्यात येत आहेत. प्रत्येक वेळी शासनाच्या वतीने सदर आरक्षण देण्यासंदर्भात चाल ढकल करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मायणीतील सकल मराठा समाजाच्या वतीने दि. ७ सप्टेंबर पासून जोपर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण करणार आहे. शासनाने लवकरात लवकर दखल न घेतल्यास साखळी उपोषण हे आमरण उपोषणात बदलणार असल्याची माहिती मराठा आंदोलनाचे मायणी शहर प्रमुख डॉ. विकास देशमुख यांनी दिली.
डॉ. देशमुख म्हणाले मराठा समाज व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर लोकसंख्येच्या आधारे संपूर्ण मराठा समाजाला १७ टक्के आरक्षण द्यावे त्याचप्रमाणे कोपर्डीच्या ताईला लवकरात लवकर न्याय देण्यात साठी आरोपींना फाशी देण्यात यावी आणि जालना येथे मराठा समाजावर लाठीमार करण्यास जबाबदार मंत्र्यांनी अपयशाची जबाबदारी मान्य करून तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा हे साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषनात होणार आहे.
या साखळी उपोषणामध्ये बांधवांची पाठरा काम करण्यासाठी विभागातून सामाजिक संघटना राजकीय कार्यकर्ते तसेच. काँग्रेस. शरद पवार साहेब समर्थक .उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना. अनेक राजकीय पक्ष संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला दिला
यावेळी डॉ. सुशांत देशमुख, गणपतराव देशमुख प्रकाश कणसे, दीपक कणसे, उदय थोरात, नवनाथ देशमुख, स्वप्निल घाडगे, नंदकुमार सुखदरे, जनार्दन देशमुख आदी क्रांतिकारी खटाव तालुक्यात प्रथमच सकल मराठा समाजाकडून उपोषणास प्रारंभ केला आहे.
यावेळी डॉ. सुशांत देशमुख, रणजीत माने . सुरज शिंदे .गणपतराव देशमुख प्रकाश कणसे, दीपक कणसे, उदय थोरात, नवनाथ देशमुख, स्वप्निल घाडगे, किरण देशमुख. नंदकुमार सुखदरे, जनार्दन देशमुख आदी उपस्थित होते. होते.