सोलापूर प्रतिनिधी
दि. ६ ते ८ ऑक्टोंबर दरम्यान नंदूरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील मुला- मुलीचीं निवड चाचणी शनिवार दि.३० सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता रंगभवन येथील रॉर्जस इंग्लिश मिडिअम स्कूलच्या मैदानावर घेण्यात येणार असून सदर राज्य स्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी १२ मुले १२ मुलींची निवड करण्यात येणार आहे.
तरी राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे सचिव खुदूस यांनी केले आहे. संपर्क : विठ्ठल कुंभार - ९४२३५२६०७१