सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मधील खालील विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले.
चि. तेजस कलागते(सुवर्णपदक), चि. पवनकुमार चकोले (सुवर्ण पदक),चि.जयवर्धन गवळी (सुवर्णपदक) कु. भारती चिंता(सुवर्णपदक),ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका सोलापूर येथे पार पडली.
या सर्व खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहॆ.या यशाबद्दल श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण शिक्षण समितीचे चेअरमन श्री धर्मराज काडादी, तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य डॉ. राजशेखर येळीकर, औश्री भीमाशंकर पटणे, श्री गुरुराज माळगे,श्री.मल्लिकार्जुन कळके, शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश राऊत पर्यवेक्षक श्री शिवराज बिराजदार व सर्व शिक्षक वृंद यांनी सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विजेत्या खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री पवन भोसले यांनी मार्गदर्शन केले.