भंडीशेगांव प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगांव येथील श्री.गणेश मंडळ वेताळवाडी यांनी श्री.गणेशाच्या आगमन प्रित्यर्थ संपूर्ण मंदिर परिसर व गल्लीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले,यावेळी मंडळाचे अध्यक्ष,कार्यकर्ते सर्वजण उपस्थित होते.
महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक येलमार यांनी गावातील मंडळांना सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते, या आवाहनास प्रतिसाद देत वेताळवाडी येथील गणेश मंडळाने संपूर्ण परिसर स्वच्छ केला,तसेच परिसरातील झाडाची योग्य छाटणी करून पाणी घातले,या सर्व अभियानाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
गणेशाची पूजा नियमित आणि वेळेवर करून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी मंडळाने प्रयत्न करणार असल्याचे यावेळी संकल्प केला आहे. या अकरा दिवसांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून सामाजिक बांधिलकी जतन करण्यासाठी काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी मनोहर येलमार,श्रावण येलमार,रणजित लाडे,आदित्य येलमार राहुल लाडे स्वप्नील येलमार, अनिल येलमार,भैरवनाथ मंदिर समितीचे उपाध्यक्ष संतोष येलमार,सचिन येड्रावकर,काकासाहेब येलमार,आबा येलमार,योगेश लिंगे,आदी उपस्थित होते