संशोधनाला चालना मिळण्यासाठी अनोखा उपक्रम
सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट च्या वतीने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी यु. जी. रिसर्च स्कॉलर स्कीम ची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती या सेंटर चे डायरेक्टर ज्येष्ठ वैज्ञानिक तथा माजी कुलगुरू *डॉ. एस. एच. पवार* यांनी दिली.
अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी लागावी, संशोधनपूरक वातावरण वाढीस लागावे, संशोधन हे देखील एक करिअर पर्याय व्हावा हा हेतू समोर ठेवून ही अनोखी यु. जी. रिसर्च स्कॉलर योजना सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमात विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी 'ओपन क्वेशचन ओपन बुक' एक्झाम घेण्यात आली. त्यानंतर मुलाखतीतून ५ विभागातून सुमारे ६० विद्यार्थी निवडण्यात आले.
या स्कीमअंतर्गत विविध आंतरशाखीय प्रकल्प विद्यार्थी तयार करतील. असेही डॉ. पवार यांनी सांगितले. या नावीन्यपूर्ण योजनेचे उद्घाटन, पु. अ. हो. सोलापुर विद्यापीठाचे पदार्थ विज्ञान विभागप्रमुख प्रा. विकास पाटिल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रा. पाटिल यांनी 'नॅनोटेक्नॉलॉजी फायदे व संधी' या विषयावर व्याख्यान सादर केले.
या उपक्रमासाठी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले यांचे मार्गदर्शन लाभले.
संशोधन संस्कृती निर्माण करणे हे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कर्तव्य आहे. संशोधनाशिवाय राष्ट्राचा विकास होणं अशक्य आहे. विद्यार्थ्यांना त्यात गोडी निर्माण होणे गरजेचे आहे त्यासाठी यु. जी. रिसर्च स्कीम हे प्रभावी व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.
श्री. संजय नवले
कॅम्पस डायरेक्टर, सिंहगड
इन्स्टिट्यूट, सोलापूर
आमच्या महाविद्यालयात 'सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेवलपमेंट' मार्फत संशोधनाला चालना देण्याचे काम होते आणि याचे संचालक डॉ. एस एच. पवार हे देशातील एक नामवंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे मार्गदर्शन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे याचा आनंद वाटतो.
डॉ. शंकर नवले
प्राचार्य, एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर.