पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शिक्षणामध्ये बाहुलीनाट्य चा उपयोग या विषयावर (सी सी आर टी दिल्ली) सांस्कृतिक संवर्धन व संशोधन केंद्र भारत सरकार द्वारका सेक्टर- 7 येथे निवासी कार्यशाळा 11 ते 25 सप्टेंबर 2023 (पहिली ते आठवी)पर्यंत आयोजित करण्यात होती.
सदर कार्यशाळेस देशभरातील मध्य भारत मधून 10 राज्ये निवडण्यात आली.10 राज्यातून किमान 10 शिक्षक यांची प्रशिक्षणार्थी यांची निवड करण्यात आली होती.अनेकांनी फॉर्म भरूनही यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून एकच प्रतिनिधी घेण्यात आला. हनुमान विद्यालय सुपली येथील अमोल हरिभाऊ कुलकर्णी यांची निवड झाली.
सदर 14 दिवसांमध्ये सी सी आर टी नाट्यगृह मध्ये मोठं मोठ्या नामांकित दिग्दर्शन चित्रपट अभिनय क्षेत्रातील दिग्गज मंडळीनी सकाळी 9 ते दुपारी 5 या वेळेत बाहुली काम,वापर,आणि आवाज,अभिनय यातून नवीन शैक्षणिक धोरणातील सर्व हेतू,तंत्रे,उद्दिष्टे यांचे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात परिसर भेट मध्ये कुतुब मिनार,हुमायून मकबरा यास भेटी देण्यात आल्या.तर आग्रा,द्वारका,मथुरा परिसर भेटी वैयक्तिक संघद्वारे करण्यात आल्या.
सदर कार्यशाळा मधून 4 लेखी परीक्षा घेण्यात आल्या तर नित्य प्रात्यक्षिक घेण्यात आले.यावेळी बिहार,छत्तीसगड,गुजरात,हिमाचल प्रदेश,दिल्ली,तेलंगणा, कर्नाटक,मध्यप्रदेश,पश्चिम बंगाल,हरियाणा,महाराष्ट्र मधून 72 सदस्य सहभागी झाले.
नित्य परिपाठसाठी गणेश चतुर्थी दिवस मिळाल्याने अमोल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची माहिती पी पी टी द्वारे सादर करण्यात आली तर पारंपरिक जीवन सांस्कृतिक नृत्ये याद्वारे मोठी रंगत आली. विशेष म्हणजे सहायक दिपांशु वशिष्ठ यांनी प्रथमच गणपती घरी बसविला.
समारोप वेळी राष्ट्रीय मंचावर चेअरमन ऋषी वशिष्ठ व्हाईस चेअरमन राहुल कुमार शर्मा,देवणारायण रजक यांच्या उपस्थितीत कार्यशाळेतील त्रुटी,उणिवा व दोषा बाबत सूचना व मार्गदर्शन साठी कुलकर्णी यांना दोन मिनिटे अवधी देण्यात आला होता.
कार्यशाळेस उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक अशोक यलमर सर,आणि सर्व स्टाफ चे सहकार्य मिळाले.