पंढरपूर प्रतिनिधी
तिसंगी-सोनके तलाव पुर्ण क्षमतेने पाणी भरणे बाबत गादेगाव चे सुपुत्र, शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणारे समाधान दादा फाटे गेले दोन दिवस आमरण उपोषणास बसले आहेत.
या उपोषणास सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते कल्याणरावजी काळे सांगोला तालुक्याचे युवा नेते शेकाप सरचिटणीस भाई डाॅ.बाबासाहेब देशमुख, व्हाईस चेअरमन भारत नाना कोळेकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणास कर्ते समाधान फाटे यांची तब्बेतीची विचारपूस करून अधिकार्यांना मंत्री महोदयांना फोन करून तात्काळ पाणी सोडण्याचे नियोजन करावे सांगीतले,सकारात्मक चर्चा झाली आहे.
यावेळी मोहन बापु नागटिळक, सुरेश बापु देठे,मल्हारी खरात,तानाजी गोफणे,बाबासाहेब हाके,तानाजी बागल,संतोष खरात आदी शेतकरी उपस्थित होते.