पंढरपूर प्रतिनिधी
एमआयटी वाखरी येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत एमआयटी जुनिअर कॉलेज मधील इयत्ता बारावी सायन्सचा विद्यार्थी अथर्व सूर्यकांत रोंगे याने दुसरा क्रमांक मिळवला असून त्याची पुढील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच याच कॉलेज मधील इयत्ता अकरावी सायन्स मधील विपूल शहाजी घोडके याने सहावा क्रमांक मिळवला आहे. एम आय टी जुनियर कॉलेजच्या प्राचार्य कार्तिश्वरी मॅडम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कॉलेजच्या क्रिडा शिक्षिका अस्मिता घोलप व क्रिडा शिक्षक शुभम तकिक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.