पिलीव प्रतिनिधी
जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून.पिलीव येथील फोटोग्राफर असोशियन संघटना यांच्यातर्फे जेष्ठ छायाचित्रकार यांचा सन्मान करण्यात आला यावेळी
पिलीवचे जेष्ठ छायाचित्रकार, नागन्नाथ उर्फ बंडू स्वामी . .अनिल वाघमारे व प्रा.देवानंद गोंजारी या तिघा जेष्ठ छाया चित्रकारासह जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे यांचा शाल श्रीफळ फेटा व हार घालून सन्मान करण्यात आला
यावेळी नागन्नाथ स्वामी यांचा सकार , असिम तांबोळी व भिष्मा करांडे यांचे हस्ते व देवानंद गोंजारी यांचा सत्कार अनिल यादव व दिनेश बोडरे यांचे हस्ते व अनिल वाघमारे यांचा सत्कार प्रशांत टकले व श्रेयश गोंजारी तर दामोदर लोखंडे यांचा सन्मान श्रेयस गोंजारी.यांचे हस्ते करण्यात आला सदर सन्मान कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी व पिलीव परिसरातील फोटोग्राफर मोठ्या संखेने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी भिष्मा करांडे ,अमोल काटे, दिनेश बोडरे,असिम तांबोळी,प्रशांत टकले,ओंकार स्वामी, अनिल यादव,श्रेयश गोंजारी. निलेश गोंजारी. दत्तात्रय ढवळे. इ. तसेच गंगोती ता माण गावचे छायचित्रकार संभाजी झिंबल. यांचा सत्कार अमोल काटे व . सागर गोंजारी यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी फोटोग्राफीच्या व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे झटपट फोटोग्राफी करण्यास मदत होत आहे असे मत दामोदर लोखंडे यांनी व्यक्त केले सुत्रसंचलन फोटोग्रफर अमोल काटे यांनी तर आभार प्रदर्शन जेष्ठ फोटोग्राफर नागनाथ उर्फ बंडू स्वामी यांनी मानले .